सांजेच्या शामल क्षणांना
कणाकणानिशी तळव्यावर पेलून
एकाकी नावाड्यासारखी
मी मध्यरात्र पार करतो
तरंग उमटवत जाणा-या
आठवणींच्या समयांशी
एक एक क्षण.. ते ही एकच कण
जोडून पुढे जाणे भाग असते.
मागे सोडून दिलेल्या
सांजेच्या निश्वासांना एव्हाना
जलसमाधी मिळालेली असते.
पुढ्यात उभे ठाकलेले दवबिंदू
एव्हाना भुकेल्या पोरासारखे
रडून थकलेले असतात.
अन मी फक्त एकाकी नावाड्यासारखा
माझ्या सुप्त संवेदनांची नाव
एकट्यानेच व्हलवत असतो
वाट चुकलेल्या नावेसारखा
कणाकणानिशी तळव्यावर पेलून
एकाकी नावाड्यासारखी
मी मध्यरात्र पार करतो
तरंग उमटवत जाणा-या
आठवणींच्या समयांशी
एक एक क्षण.. ते ही एकच कण
जोडून पुढे जाणे भाग असते.
मागे सोडून दिलेल्या
सांजेच्या निश्वासांना एव्हाना
जलसमाधी मिळालेली असते.
पुढ्यात उभे ठाकलेले दवबिंदू
एव्हाना भुकेल्या पोरासारखे
रडून थकलेले असतात.
अन मी फक्त एकाकी नावाड्यासारखा
माझ्या सुप्त संवेदनांची नाव
एकट्यानेच व्हलवत असतो
वाट चुकलेल्या नावेसारखा